Marathi Shala

Marathi Shala is one of BMM’s most successful initiatives and is run by many North America Marathi Mandal’s and Aaple Mandal MMD is proud to bring it to Detroit area!!

Marathi Shala is conducted in 2 venues- Troy, MI and Canton, MI . 

Registration open for any child (Member/Non-Member) between 5-18 years of age.

Registration for Academic year 2024-2025 is now OPEN !!

Register here for Academic year (2024-2025).

 

Troy Shala

Troy, MI
Venue: Bharatiya Temple, Troy MI – 6850 N Adams Rd, Troy, MI 48098
Timings: Sunday, 4-5:30 pm.

ट्रॉय मराठी शाळा – 

Diwali 2023 – Photos here and Video here

रविवारची सुरुवात काहीतरी रडतच झाली होती. क्रिकेटच्या मॅचचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पहाटे तीन वाजता उठून अगदी खुशीने मॅच बघायला सुरुवात केली सकाळी साडेपाच सहाला डोक्यावर पांघरून घेऊन आता तरी खेळ चांगला होईल याची वाट बघितली . ती वेळ आलीच नाही. मग कोणाकोणा च्या नावाने खडे फोडत कामाला सुरुवात केली.
दुपारी प्राजक्ताने व्हाट्सअप वर निरोप पाठवला मॅच संपली आहे कामाला लागा. साडेतीन पर्यंत सगळ्यांनी देवळात या.
दुपारी चार च्या दरम्यान शाळेत मुलं येऊ लागली. नवीन छान छान कपडे घालून खुशीने आज आली होती. प्रार्थना झाल्यावर मुलांना सांगितले की आपापल्या वर्गात न जाता आज आपण दिवाळी इथे साजरी करूया . त्यावर त्यांनी जो काय आनंदाने जल्लोष केला त्याच्यावरून आम्हाला भारत जिंकल्याचे समाधान मिळाले.
दिवाळीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिसरीच्या मुलांनी सगळ्यांना दिवाळीची माहिती सांगितली, चौथीच्या मुलांनी वेगवेगळे पदार्थ कसे बनवतात याची माहिती दिली. चकलीच्या भाजणीत ओवा आणि तीळ घातला तरच चकलीला स्वाद आणि खुसखुशीतपणा चांगला येतो हे मला काल चौथीच्या मुलांकडून कळले. पाचवीच्या मुलांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या आणि चौथीच्या मुलांनी किल्ल्यांबद्दल सुद्धा माहिती दिली. त्यानंतर सर्व मुलांकडून एलईडीचे छोटे दिवे वापरून कागदाच्या पणत्या करून घेतल्या . मुलं एकदम खुशीत उड्या मारत सगळ्यांना ते दिवे दाखवत होती. हॉलचे दिवे बंद करून पणत्या ओवाळून दिवाळीच्या शुभेच्छा जोरात दिल्या. त्यानंतर मुलांनीच आणलेला फराळ सगळ्यांनी वाटून खाल्ला . दोन अडीच तास इतके मजेत गेले की सकाळची क्रिकेटची मॅच आम्ही केव्हाच विसरून गेलो होतो.

वार्षिक स्नेहसंमेलन 2023 Photos Here
Pandemic नंतर प्रथमच ट्रॉय मराठी शाळेनी ने वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करायचा ठरवलं आणि मग काय सर्व शिक्षक मुलांसह तयारीला लागले. गेले २ महिने अभ्यासाबरोबरच वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी ही जोरात चालू होती . शेवटी आज तो दिवस आला आणि दुपारी ३ वाजता सर्व मुले नटून थटून वेशभूषा करून मंदिरात आली.
कार्यक्रमाची सुरवात ट्रॉय मराठी शाळेच्या संचालिका प्राजक्ता केतकर ह्यांनी केली. तसेच वेळात वेळ काढून महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईटच्या President शीतल सोनार आणि Vice-President मानसी डहाणूकर ह्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली .
तिसरी (अ) च्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाला वंदन करून ‘गणेशोत्सव’ हा कार्यक्रम सादर केला. बालवर्गातील मुलांनी ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ आणि ‘छान किती दिसते फुलपाखरू’ ह्या गाण्यावर नृत्य केलं आणि स्टेजवर छोटी छोटी फुलपाखरे भिरभिरली. तर , पहिली ( अ ) च्या मुलांनी ‘बाहुली माझी छान ग’ आणि ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ही गाणी सादर करत चॉकलेटच्या बंगल्याची सैर करवून आणली .
पु . ल . देशपांडे , कुसुमाग्रज , शांता शेळके , नारायण सुर्वे ह्या लेखकांवर सुंदर भाषणं देऊन मुलांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी’ हे गाणं दुसरी (अ ) च्या मुलांनी अर्थासकट सादर केले . महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांचे महत्व चौथीच्या मुलांनी पटवून दिले.
रंगदेवतेला वंदन करून तिसरी (ब) च्या मुलांनी दिलीप प्रभावळकर ह्यांचे “पंपू आजारी आहे ” हे नाटक सादर केले . वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे नुसती गाणी आणि भाषणं असून कसे चालेल? नृत्य तर पाहिजेच ना!
‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा , प्रणाम घ्यावा हा माझा महाराष्ट्र देशा’ ह्या सुंदर गाण्यांवर पहिली (ब ) च्या मुलांची पावलं थिरकली. ‘उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला’ ह्या देशभक्ती गाण्यावर दुसरी (ब ) च्या मुलांनी नृत्य सादर केले.
मेधा साठे ह्यांनी सुंदर आवाजात पसायदान म्हणून ह्या कार्यक्रमाची सांगता केली .
बरं का मंडळी , ह्या सर्व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःवर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली. आणि हो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ‘cheer -up’ करायला आई -वडील ,आजी -आजोबा, मित्र -मैत्रिणी उत्साहाने स

Please find HERE the link for News article by वसुधा नाईक थेट यूएसए हून

Troy school Ganapati 2022 Video

 

 
Canton Shala: 
Canton, MI : 
Venue: Hindu Temple of Canton, Canton-MI – 44955 Cherry Hill Rd, Canton, MI 48188
Timings: Sunday, 4-5:30 pm.
Canton Ganapati Celebrations : Ganapati 2022 Video1Ganapati2023 Video 

Canton मराठी शाळा – वार्षिक स्नेहसंमेलन 2024 – Video link and Photo Link and Beautiful writeup here

“कँटन मराठी शाळा” वार्षिक स्नेहसंमेलन २०२४

रविवार ०९ जून हा तसा एकदम खास दिवस म्हणूनच उजाडला होता. एकीकडे T20वर्ल्डकपमधे भारतानी पाकिस्तान विरुद्ध हारता हारता जिंकायची कमाल केली होती आणि दुसरीकडे आमचा, कँटन मराठी शाळेचा, २०२३-२४चा हा वार्षिक सोहळा प्रथमच एखाद्या मोठया सभागृहात भरणार होता. 

मे महिन्यामधे तोंडी आणि लेखी परीक्षेची धाकधूक संपली होती आणि जूनमधे सगळ्या विद्यार्थी, शिक्षकांची शाळेचा वार्षिक समारंभ साजरा करायची धामधूम चालू झाली होती. कँटन मधून सीमोल्लंघन करून Northville मधे भरलेल्या ह्या सोहळ्याला ५० विद्यार्थी, त्यांचे पालक, आजी-आजोबा असे सगळे मिळून साधारण १४० जण उपस्थित होते. 

बालवर्ग ते चौथीच्या प्रत्येक वर्गातील मुलांनी पालकांसमोर मराठीतून गाणी, श्लोक सादर केले. सरस्वती प्रार्थना आणि भारत-USA च्या anthems नंतर बालवर्गातील २०+ च्या बालचमुनी ‘घडाळ्यात वाजला १’ गाण्यातून अभ्यास न करायची कारणे सादर करून पालकांना थक्क केले. त्यानंतर पहिली ते चौथीच्या मुलांनी मनाचे श्लोक, ‘सांग सांग भोलानाथ’, पसायदान, शिवरायांची गारद, keyboard, Viola वर गाणी असे विविध प्रकार सादर करून मराठी शाळेतील शिकवणीची आणि त्यांच्यातील गुणांची उत्तम झलक दाखवली. 

२०२३-२४ चा video flashback बघून सगळ्यांनी पूर्णवर्षात केलेल्या उत्सवांचा, धमाल मस्तीचा एक reel आपापल्या memory मधे upload केला, तो कायमचा स्मरणात राहण्यासाठीच. 

 

सर्वांना प्रशस्तिपत्रक प्रदान करताना विद्यार्थी-शिक्षक-पालक आणि सातासमुद्रांपालिकडून आलेल्या आजी-आजोबांच्या चेहेऱ्यावरून आपल्या नातवंडाचे कौतुक ओसंडून वहात होते. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रशांत जावकर, पदाधिकारी दीपक काका ह्यांची उपस्थिती शिक्षक-विद्यार्थ्यांना दिलेली शाबासकी सगळ्यांचा उत्साह द्विगुणित करून गेली. दीपा इंगळे कार्यक्रमाला येऊ नाही शकल्या तरी त्यांचे पाठबळ, मार्गदर्शन बहुमोल होते.

बक्षिस समारंभा नंतर मग मस्त पैकी सगळ्यांनी पिझ्झा, समोसे, Cupcakes, cutlets वर यथेच्छ ताव मारला आणि Summer vacationsचं planning discuss करत करत एकमेकांचा निरोप घेतला. 

२०२३-२४ च वार्षिक सोहळा अजून एका कारणानी अतिशय खास होता, कँटन मराठी शाळेला यंदा १० वर्षे पूर्ण झाली! ५-६ विद्यार्थ्यांपसून चालू झालेला हा प्रवास दहावर्षात ५० विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोचला आहे आणि उन्हाळ्याचा थोडासा विसावा घेऊन, बालक-पालक-शिक्षकांचा संघ नव्या दमानी २०२४-२५ मधे अजून मोठा पल्ला गाठायला तयार आहे. तेव्हा भेटूच परत येत्या सप्टेंबर मधे…

ता. क. : दशकपूर्ती सोहळा उत्तमरित्या पार पाडण्यात सर्व शिक्षकांचे अपरिमित कष्ट होते. त्यासाठी सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि आभार. आम्हा सर्वांना कायम आर्थिक, मानसिक पाठबळ दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईटचे (#MMD) देखील धन्यवाद. 

Canton Shala- ‘जागतिक मराठी भाषा दिन’ Sunday March 3rd, 2024: Video Here and a Beautiful write up here.

Canton Shala- Tulashicha Lagna 2023. Exciting details of wedding HERE. Photos HERE. Video of this beautiful wedding HERE.

Canton मराठी शाळा – वार्षिक स्नेहसंमेलन 2023 Youtubelink Here

 

 


MMD Marathi Shala is open to all MMD Members as well as Non-Members.

Please contact us at marathishala@mmdet.org for more information. Your feedback is valuable to us.

We are also looking for volunteers who can help us in this initiative. If you can volunteer as a teacher or teacher assistant, please email at marathishala@mmdet.org.


Videos – Troy Shala

 































Jagatick

Scroll to Top