

Canton Shala:
Venue: Hindu Temple of Canton, Canton-MI – 44955 Cherry Hill Rd, Canton, MI 48188
Timings: Sunday, 4-5:30 pm.
Few special events from Shala !!
Canton मराठी शाळा – दिवाळी 2024 – Video link
“कँटन मराठी शाळा” दिवाळी २०२४
दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी कँटन मराठी शाळेचे दिवाळी celebration धुमधडाक्यात साजरे झाले!
दर रविवारच्या शाळेतील अभ्यासाला सुट्टी देऊन सगळी मुले, शिक्षक छान भरजरी कपड्यांमध्ये कॅंटन हिंदू temple मधे जमले होते आणि दिवाळीचा उत्सव सर्वांनी आनंदात साजरा केला.दिवाळीबद्दल, त्यातल्या स्वादिष्ट फराळाबद्दल आणि आकाशकंदील, पणती, फुलबाजी अशा नानाविध दिवाळीशी संबंधित वस्तूंची माहिती मुलांनी “show and tell” मार्फत सांगितली.बालवर्ग आणि पहिलीचे विद्यार्थी त्यानंतर “ठिपक्यांची रांगोळी” शिकण्यात रमून गेले आणि मग त्यात रंग भरून सर्वांनी रांगोळीची सुंदर कलाकृती बनवता बनवता, दिवाळी-रांगोळी अशी सगळ्या “आळ्यां”ची गंमत समजून घेतली.दुसरीपासून पाचवी पर्यंतच्या मुलांनी “दिवाळी special Bingo” खेळला आणि उभ्या-आडव्या “आळी”तली चित्र पूर्ण करून बक्षिसे पटकावली. मंदिरामध्ये ७० मुलांनी साचेबद्ध “आळी” मधे उभं राहून “दिवाळी” निमित्त सरस्वती प्रार्थना, सुखकर्ता दुखहर्ता आरती आणि गुरुजींबरोबर ॐ जय जगदीशाची पण आरती केली.शाळेतर्फे सर्वांना दिवाळी भेट म्हणून मराठी स्वाध्याय पुस्तिका आणि मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या दिवाळी कार्यक्रमाची तयारी उत्तमरित्या केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि आभार
कार्यक्रमासाठी आर्थिक पाठबळ आणि venue ची मदत केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉईट (MMD) आणि कँटन हिंदू templeचेही आभार
पुढील दिवाळीपण आपणा सर्वांना अशीच मंगलमय आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा!
– अभिजीत जोगदेव
(कॅंटन मराठी शाळा मुख्याध्यापक)
Canton मराठी शाळा – वार्षिक स्नेहसंमेलन 2024 – Video link and Photo Link and Beautiful writeup here
Canton Shala- ‘जागतिक मराठी भाषा दिन’ Sunday March 3rd, 2024: Video Here and a Beautiful write up here.
Canton Shala- Tulashicha Lagna 2023. Exciting details of wedding HERE. Photos HERE. Video of this beautiful wedding HERE.
Canton मराठी शाळा – वार्षिक स्नेहसंमेलन 2023 – Youtubelink Here
Canton Ganapati Celebrations : Ganapati 2022 Video1, Ganapati2023 Video
MMD Marathi Shala is open to all MMD Members as well as Non-Members.
Please contact us at marathishala@mmdet.org for more information. Your feedback is valuable to us.
We are also looking for volunteers who can help us in this initiative. If you can volunteer as a teacher or teacher assistant, please email at marathishala@mmdet.org.