Banner
Home Events/RSVP Membership Publication Photo/Video Youth Corner Sponsors About Us
Anjali Anturkar नमस्कार मंडळी,
आपल्या सर्वांना डेट्रॉइट महाराष्ट्र मंडळाच्या वतीने संक्रांतीच्या अन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ह्या वर्षी मला MMD च्या President पदी सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! I hope to be worthy of your trust and love. I am also mindful of the huge task I have in front of me. आपल्या सर्वांचे सहकार्य आणि कमिटीतील सहकारी ह्यांच्या मदतीने आपण हा जगन्नाथाचा रथ नक्कीच पुढे नेऊ.

गेल्या काही वर्षांत, MMD ने तुमच्यासाठी धमाकेदार कार्यक्रमांची रांग लावून memberships चे रेकॉर्ड्स मोडले. त्याही पुढे जाऊन तुमच्या अपेक्षा काय आहेत हे समजावे यासाठी दिवाळीच्या कार्यक्रमात आमच्या २०१२ च्या कमिटीने survey ठेवला होता. त्यातून काही आवडी-निवडी कळल्या, काय चुकतंय, काय बरोबर आहे याचा feedback मिळाला. त्याचा उपयोग आता आम्हाला programs planning मध्ये होतोय. यंदासुद्धा आम्ही तीच परंपरा चालू ठेवायचा plan केलाय. पण वर्ष आत्ताच सुरूच झालंय, "आगे आगे देखो, क्या होता है! "

जस-जसे आपले मंडळ वाढतंय, तस-तसा आपला परिवार ही वाढतोय. आणि मग ह्या वाढत्या परिवारातील सर्व members ची आवड-निवड ही सुद्धा निरनिराळी असणारच. आज आपल्यामध्ये असे members आहेत जे इथे अमेरिकेत पहिल्यांदाच आलेत, आणि असेही आहेत ज्यांनी इथे आयुष्य काढलेय. असे आहेत कि ज्यांची आडनावं मेहता आणि बुटाला आहेत (हे दोघेही आपले कमिटी मेम्बर्स आहेत!) आणि असेही आहेत कि ज्यांची उपनावं "Gary" किंवा "Susan" आहेत.

मग कशी ठरवावी आपली मूळ ओळख? कसं ठरवावं कि कोणासाठी कोणता program hit होईल? काय असावा आपला मूळ उद्देश? वर्षांतून सहा-सात वेळा जमून भेटण्यापुरतच हे मंडळ आहे का? का ही असावी आपल्या संस्कृतीची आठवण अन ओळख ? मला ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. Maybe like Dr. Seuss said, "Sometimes the questions are complicated and the answers are simple" असेच सारे प्रश्न आणि आपली उत्तरं मंडळाची दिशा ठरवतील… ह्या वर्षी आणि त्याच्याही पुढे!

आपण दणदणीत मोठ-मोठे कार्यक्रम करणारच आहोत. पण तुमच्याच feedback नुसार तुम्हाला ह्या "programs with broad appeal" बरोबरच कविताही ऐकायच्या आहेत. कॅरम सुद्धा खेळायचा आहे. Marathon मध्ये भाग घ्यायचा आहे. "आमच्या लहान मुलांना सुद्धा आवडेल असं काहीतरी करा" असंही हवं आहे.

म्हणूनच मंडळ वाढताना सुद्धा आपली संस्कृती व साहित्य ह्यांना स्थान असावे ह्यासाठी आम्ही "रसिका तुझ्याच साठी" मालिकेला अजून जास्त वाव द्यायचा plan केलाय. गेल्या वर्षीचे लोकप्रिय sports आणि marathon programs आम्ही यंदा वाढवतोय. ओढून ताणून उगाच MMD च्या programs ना येऊन बसण्याऐवजी Youth Committee ने मुलांना खास आवडतील असे programs ठरवले आहेत. ही तुम्हा सर्वांसाठी एक खास संधी आहे. "शी, काय बोअर कविता" असं म्हणण्याऐवजी १९ फेब्रुवारीचा "एक कविता हरवलेली" ह्या प्रोग्रॅम ला या. "पाय मुरगळला तर!" असं म्हणण्याऐवजी badminton खेळून बघा. आणि बच्चे कंपनीने स्वतः आखलेल्या "Movie Night " ला मुलांना बिनधास्त पाठवा. कदाचित कविता ऐकून तुमचंही "Valentine Day" च्या दिवशी हृदय धडधडायला लागेल. कदाचित तुम्ही दर Week-end ला खेळायला जायला लागाल. कदाचित माझ्या मुलांसारखंच तुमच्या मुलांचंही खास "MMD Friend Circle" तयार होईल.

साता-समुद्रापार आपण सर्व जमतो ते आपल्या मराठीच्या ओढीने. त्यामुळे मला एव्हढं नक्की कळतंय कि पिझ्झा कितीही awesome लागला तरी, मराठी जिभेला हवं असतं ते झकास झुणका-भाकर! त्यामुळे मला खात्री आहे कि आपण सगळे एकत्र येऊन हा घेतला वसा पार करू! “मराठा तितुका मेळवावा” हाच ध्यास घेऊन आपल्या मंडळाची membership वाढवू. हे आपले मंडळ आहे. मी, माझी कमिटी आणि even Board of Trustees, आम्ही सगळे शेवटी ह्या टीमचे दिसणारे चेहेरे! पण खरी शक्ती आहे तुम्हा सगळ्यांचे मराठीपण! आपण सगळे आम्हाला मदत करा आणि अटकेपार फडकलेला मराठी झेंडा आपण पार डेट्रॉइट पार नेऊ!

शेवटी मला ज्ञानोबा माउलीच्या पसायदानातील त्या ओळी आठवताहेत.. जें खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परे जडो। मैत्र जीवाचें॥ थोडक्यात आपली ही मराठी संस्कृती मुळातच global आहे. तर मग आपण सगळे global journey केलेले मित्र आता ह्या मंडळाच्या स्नेहबंधांचे रुपांतर करू या रेशीम-गाठीत अन जोडु या जीवाचे मैत्र!

माझ्या कमिटी कडून तुम्हाला "Happy New Year" and Lets Rock 2012!!

अंजली अंतुरकर, President MMD 2012

शब्दांकन: अमित मेहता
Akash Aloha Asha Kulkarni HiGlow
Bollywood DJ Indo Fusion Taal Academy
Koojun Music Sami Banner

Web Design: Bharati Mehendale Database Design: Sanjay Mehendale Webmaster & Admin: Mandar Purekar
© 2012 Maharashtra Mandal of Detroit